मुंबई : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने १३ ऑक्टोबरपासून सर्व कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केलेले होते. हे आंदोलन आज स्थगित करण्यात आले आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूलचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची कार्यकारणीची आज पुणे येथे बैठक झाली.
या बैठकीतील चर्चेनुसार 13 ऑक्टोबरपासून सुरु झालेले आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलेले आहे. हे आंदोलन स्थगित झाल्याने सर्वसामान्यांची कामे होणार आहे.
तथापि संदर्भीय झालेल्या चर्चेनुसार जगताप यांची बदली १५ दिवसात करण्यात यावी, अन्यथा स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरु करण्यात येणार आहे, असे नाशिक विभागीय सरचिटणीस संतोष तनपुरे यांनी सांगितले.
Post a Comment