बीड : पूर्वी सोने, चांदी व रोख रक्कम चोरीला जात होती. क्वचितच किराणा व कापड दुकाने फोडल्याच्या घटना घडत होत्या. मात्र आता सरसकट किराणा दुकान फोडून खाद्य वस्तूंची चोरी होऊ लागलेली आहे. आता मात्र गाढवांचीही चोरी होत असल्याची घटना समोर येत आहे.
ऐका हो ऐका... विश्वास बसणार ऐकून म्हणून आता सविस्तर बातमीच वाचा... आता सोन्या प्रमाणेच गाढवांनाही भाव आलेला आहे. त्यामुळे आता चोरट्यांनी गाढव चोरीकडे आपला मोर्चा वळविला असल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातील परळी या शहरातून चोरटयांनी विविध भागातील तीन दिवसात वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांचे गाढव पळवून चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. चोरटयांनी आता सोन चांदीच्या व्यतिरिक्त चक्क गाढवाला चोरून नेल्याची घटना घडली आहे.
चोरटयांनी परळी शहरातील विविध भागातून 18 लाखापेक्षा जास्त किमतीचे गाढव चोरून नेले. या तीन दिवसात तब्बल 124 गाढव चोरी गेल्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच प्रशासन जागे झाले आहे. पोलिस आता दिवाळीच्या काळात चोरी गेलेल्या गाढवांचा शोधात लावत आहे.
ऐन सणा सुदीच्या काळात गाढव चोरी गेल्याने मजुरांवर संकट आले आहे. सदर चोरीची तक्रार मजुरांनी पोलिसात केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या म्हण्यानुसार, गाढव चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आता ऐन दिवाळीच्या वेळी पोलिसांना गाढव शोधण्याची वेळ आली आहे. सोने व चांदीचे दुकाने फोडणारे चोरटे शोधणे तसे सोपे आहे. मात्र गाढव चोरणारे कसे शोधायचे असा प्रश्न पोलिसांपुढे आहे.
Post a Comment