नेवासा : राज्यात सध्या बलात्काराचे सत्र सुरूच आहे. काही घटनातील आरोपींना अटक झालेली आहे. तर काहींचा शोध सुरु आहेत. त्यातच आता नवीन घटनेची भर पडली आहे. रामडोह (ता. नेवासा) येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका विवाहित महिलेवर चार जणांनी दोन वेळा सामूहिक अत्याचार केला आहे.
विवाहित महिलेने आरोपीच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी देणे आणि शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन महिन्यापूर्वी महिलेचे पती, मुलगी व सासरे कामानिमीत्त बाहेर गेले असता विवाहितेला घरात एकटी बघून चारही आरोपी बळजबरी घरात शिरले आणि महिलेच्या तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर अत्याचार केला.
एवढेच नाही तर या घटनेची वाच्यता कुठे ही केली तर तुला ठार मारू अशी धमकी दिली. महिलेने घाबरून घडलेले कुठेही सांगितले नाही. महिला माहेरी गेली असता आरोपींनी तिला फोन करून धमकावले.
हा सगळा प्रकार तिचा माहेरी समजला. त्यानंतर आठ दिवसापूर्वी पीडित महिला शेतात एकटी झोपलेली होती. तिथे हे आरोपी पोहोचले आणि तिचे हातपाय बांधून तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.
अखेर त्या आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाणे गाठले. त्या चारही आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सामूहिक अत्याचार करणारे संतोष अप्पासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले, ऋषिकेश काकासाहेब गोरे आणि संदीप गोरख आगळे यांच्या विरोधात सामूहिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, ब्लॅकमेल करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहे.
या चारही जणांना त्वरीत अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे नेवासा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Post a Comment