ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण...

नगर ः कोरोनाचा आलेख कमी जास्त होत आहे.  आज (रविवारी) 145 रुग्ण आढळून आलेले आहेत.


जिल्ह्यात 140 बाधित आढळून  आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 60 खासगी  तपासणीत 63 व अँंटीजेन तपासणीत 22 जण बाधित आढळून आलेले आहेत. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, जामखेड ०१, कर्जत १४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०८, पाथर्डी ०२, राहुरी ०५, संगमनेर १०, शेवगाव ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०४  आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०२, नगर ग्रा. ०२, नेवासा ०७, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहता २८, राहुरी ०६, संगमनेर ०२, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २२ जण बाधित आढळुन आले. अकोले ०१,  कर्जत ०३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०४, पारनेर ०४, राहता ०२, शेवगाव ०१, श्रीरामपूर  ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा आलेख वाढत चालल्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post