पुणे : तीन महिन्याच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच आपल्या मुलीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा खून संबंधित महिलेने अल्पवयीन मुलाच्या मदतीने केला आहे.
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय कारण सांगायचे या भीतीपाोटी तिनेच हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. येरवडा पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून १३ वर्षाच्या मुलालाही ताब्यात घेतले आहे.
महिलाही अहमदनगरची असून मागील काही महिन्यांपासून पुण्यात आपल्या भावाकडं रहायला आली आहे. ती घटस्फोटीत महिला असून तिला एक १३ वर्षांचा मुलगा देखील आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता.
२२ तारखेला घरात झोपले असताना आपल्या ३ महिन्याच्या मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार महिलेने येरवडा पोलिसांकडे केली. त्यानुसार येरवडा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन अधीकच्या तपासास सुरवात केली.
मुलागा आणि महिला यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय वाढला. चौकशी दरम्यान महिलेने कबूली दिली की मुलगी सतत रडत होती. तिचा जन्म अनैतीक संबंधातून झाला होता.
त्यामुळे आपणच मुलाच्या साहय्याने मुलीला ठार मारले आणि मृतदेह नदीत फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नदीत जाऊन शोध सुरु केला आणि मृतदेह आढळून आला. तो शवविच्छेदनाकरीता ससून रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी आई व मुलाला ताब्यात घेतले आहे.
Post a Comment