रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. देवरुख संगमेश्वरच्या दरम्यान भूकंपाचे हादरे बसले आहे. या भूकंपाची तीव्रता 4.46 रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे.
देवरुख संगमेश्वरच्या पट्ट्यात आज संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची नेमकी जागा माहीत नसली तरी संध्याकाळी पाच वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
4.46 स्केलचा भूंकप होता. त्याचे केंद्र हे पाच किलोमीटरच्या परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ साताऱ्यातील कोयना धरण परिसर सुद्धा भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती.
याआधीही मार्च महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपाच्या धक्कामुळे परिसरात एकच घबराट पसरली होती.
अनेकांच्या घरातील भांडी ठेवण्याचे रॅक हलण्याने भूकंपाची जाणीव झाली होती. तर काही जणा झोपेत असताना बेड हल्ल्याने भीतीने जागे झाले होते. पण, सौम्य धक्के असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Post a Comment