शेतकर्यांना न्याय द्या... राजकीय संघर्ष टाळा...

नगर : शेतकर्यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनाला आता भाजपाने विरोध केला असून या आंदोलनात व्यापार्यांसह इतरांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे या राजकीय खेळात मात्र शेतकरी भरडला जात असल्याचे दिसून येत आहे. कांद्याचे भाव पडल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरतात, तेव्हा मात्र या राजकीय पक्षांना शेतकरी का दिसत नाही. त्यांच्या आंदोलनाला हीच राजकी़य मंडळी साथ का देत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.


उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या वाहनाखाली शेतकर्‍यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या बंदच्या हाकेला राज्यभरातील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. 

शेतकर्यांचा प्रश्न असल्याने सर्वजण या बंदमध्ये सहभाग नोंदवून लखीमपूर येथील शेतकर्यांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु या आंदोलनाला भाजपाच्या काही नेत्यांनी विरोध केला असून आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे.


सत्ताधारी कधी विरोधी अन् विरोधक बाजूने तर कधी विरोधक विरोधी व सत्ताधारी शेतकर्यांच्या बाजुने रहात आहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न जैसे थेच रहात आहे. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे. तर शेतकर्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


शेतकर्यांच्या प्रश्नावर आता महाविकास आघाडी रस्त्यावर उतरत आहे. तर भाजपाकडून जुने प्रकरणे काढून शेतकरी यांविरोधात झालेल्या कारवाईची चित्रफीत व संदेश टाकून महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला  तरी महाविकास आघाडी नव्हे तर शेतकरी अडचणीत येत आहे.

कृषी प्रधान देशात शेतकर्याला हक्कासाठी लढून त्याच्या पदरी काहीच पडत नाही. याला राजकारण जबाबदार ठरत आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकलझाले तरच शेतकरी पोटभर खाणार असून आपल्यालाही भरपूर धनधान्य मिळण्यास मदत होणार आहे.

हा बंद शेतकर्यांसाठी असला तरी त्याचा तोटा राज्यातील काही ठिकाणी दिसून आला. लिलावाला आणलेला कांदा अनेकांना माघारी नेण्याची वेळ आली. कांदा नाशवंत माल असल्याने त्याचे लिलाव बंद मधून अनेक ठिकाणी वगळण्यात आले नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post