नगर ः येथील माळीवा़डा बसस्थानकात एसटीचा धक्का लागल्याने वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळेच एकच खळबळ उडाली आहे. यावेळी उपस्थित प्रवाशांनी एसटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
या अपघातात नामदेव चतरु जाधव (वय 76, रा. ठाकर, शनिचे राक्षसभवन, ता. गेवराई, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. मृत व्यक्तीजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून हे नाव स्पष्ट झालेले आहे. जाधव हे माळीवाडा बसस्थानकात गावाकडे जाण्यासाठी आले होते. त्यांना अहमदनगर-नाशिक बस क्रमांक एम. एच. सहा एस. 8464चा धक्का लागून ते जागीच ठार झाले.
या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. या अगोदरही शहरातील बसस्थानकांमध्ये अशा प्रकारचे अपघात झालेले आहे. काही महिन्यांपूर्वीच तारकपूर आगारातही अशाच प्रकारचा अपघात घडला होता. त्यात एसटीचा कर्मचारी जखमी झालेला होता. अशा प्रकारचे अपघात वारंवार घडू लागल्याने आता एसटी प्रशासनाने बसस्थानकांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
Post a Comment