आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईची धडक...

यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या क्वालिफायर एक सामन्यात  चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर चार गडी राखून विजय मिळवला. 


दिल्लीने चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान सहा सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. 

चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 70 धावांची शानदार खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने 63 धावा केल्या. मोईन अलीने 16 धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. 

धोनी व रवींद्र जाडेजा यो जोडीने चेन्नईला विजयापर्यंत पोहचवले आहे. धोनीने नाबाद 18 धावा केल्या. तर जाडेजाने त्याला साथ दिली.

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी चार गडी व दोन चेंडू राखून हे आव्हान पूर्ण केले.  

सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने या सामन्यात शतकी भागिदारी करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात धुवांधार फलंदाजी करत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्यावर कळस चढवला. 

धोनीने त्याच्या आक्रमक शैलीत ही मॅच फिनिश केली. धोनीने 6 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा केला.

या विजयासह चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली. चेन्नईची आयपीएलच्या इतिहासातील अंतिम फेरीत पोहचण्याची नववी वेळ ठरली. 

दरम्यान आता सोमवारी बंगळुरु विरुद्ध कोलकाता यांच्यात एलिमेनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. यात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post