नगर : घरात चोरी होतेय हे खरे असले तरी चोर घरात प्रवेश कसे करतात, याची कारणे प्रत्येकाने शोधून त्यावर प्रतिबंध करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने जर स्वत:कडून होणार्या छोट्या छोट्या घटना टाळल्या तर लवकरच चोरीच्या घटना कमी होऊ शकतात.
एका व्यापार्याच्या घरी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ही चोरीची घटना घडल्याचे सकाळी लक्षात आले. सगळेच जण गडबडून गेले. कपाट व इतर वस्तू पाहू लागले. पण चोरी काहीच गेले नसल़्याचे लक्षात आल्यानंतर सर्वजण निश्चिंत झाले.
मग चोरटे घरात कसे आले यावर चर्चा मंथन सुरु झाले. त्याच चर्चेत घरातील व्यक्तींच्या चुकीमुळेच हा प्रकार घडल्याचे उघड झाले. घराच्या वरती असलेला गच्चीचा दरवाजा उघडा ठेवला. त्यामुळे चोरट्यांनी शेजारील कंपाउंडवरून घरात प्रवेश केला.
त्यानंतर इतरांना घरात आणण्यासाठी जिन्यातील भिंत फोडण्यात आली. सुदैवाने घरात त्यांच्या हाती लागले नाही. कोणाचं काय चुकलं हे सर्वांच्या लक्षात आलं. चर्चा घरात होऊन त्यावर खबरदारी घेण्याचा निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात आली.
एका कुटुंबात मुले रात्रीचा चित्रपट पहात बसले होते. मात्र पुढील रुममध्ये चित्रपट सुरु होता. मागच्या रुमचा दरवाजा हवा येण्यासाठी उघडा ठेवला होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात शिरून सामानाची उचकापाचक करून मिळेल ते चोरून नेले. त्यावर चर्चा होऊन प्रत्येकाच्या झालेली चूक लक्षात आली. परत तशा चुका टाळण्यात येत आहे.
कामाच्या नादात एकाने दुचाकी एका दुकानापुढे लावली. मात्र चावी तशी दुचाकीला त्याच्याकडून गडबडीत विसरली. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी साधला. दुचाकी चोरून नेली. हे कसे घडले हे संबंधितांच्या चावी न सापडल्यावर लक्षात आले. परंतु एका चुकीचा मनस्ताप मात्र त्याला सहन करावा लागला.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी व लग्नसमारंभात जाण्यासाठी अनेक कुटुंब एकत्र जातात. आता तर समाज माध्यमावर फोटो सेशन करण्याची प्रथाच सुरु झालेली आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला..त्यानंतर आपण सगळ्यांनी जायला नको होते. हे कुटुंबाच्या लक्षात आले. पण वेळ निघून गेली होती.
ही फक्त उदाहरणे आहेत. पण अशा प्रकराच्या अनेक चुका नेहमीच प्रत्येकाकडून घडत असतात. त्याच चुकांचा फायदा चोरटे घेतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याकडून चूक होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपल्या चुकांचा मनस्ताप सर्व कुटुंबाला होऊन त्याचा ताण पोलिस प्रशासनावर पडत असतो.
पण प्रत्येकाने जर स्वत:च्या चुका टाळण्याची सवय लावून घेतली तर स्वत: बरोबर कुटुंबियांना होणार्या त्रासातून त्यांची सुटका होऊ शकते. तसेच पोलिस प्रशासनावर वाढत चाललेला चोर्यांचा तपासाचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे.
Post a Comment