श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर घटस्थापना उत्साहात... ऑनलाईन पास असणाऱ्यांनाच प्रवेश...

पाथर्डी : मोहटादेवी गडावर मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून विधीवत व धार्मिक उपचारांचा मंत्रघोषात घटस्थापना देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर व आरती कुर्तडीकर यांचे हस्ते झाले.


परंपरेप्रमाणे मोठा देवी चा सुवर्ण मुखवटा व अलंकार दर्शनासाठी मोहटे गावातून मोटारी द्वारे देवी गडावर आणण्यात आले. मंदिरे उघडण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी दिलेल्या आदेशानुसार केवळ ऑनलाईन पास असलेल्या पाच हजार झाला. 

त्याप्रमाणे देवस्थाने ऑनलाईन दर्शन पासची केलेल्या व्यवस्थे प्रमाणे सकाळी सात वाजता अहमदनगर येथून पायी दर्शनासाठी आलेले बांधकाम अभियंता राहुल शेळके व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक बबन शिंदे यांनी सर्वप्रथम या सुविधेचा लाभ घेतला. 

ऑनलाइन सेवेमुळे व देवस्थाने केलेल्या स्वागत यामुळे तसेच सुमारे सहा महिन्याच्या कालानंतर त्यांचे हस्ते देवी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी देवीचा जयजयकार करण्यात आला देवस्थान समितीने त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र शासनाने मंदिर भाविकांचे दर्शनासाठी खुले करण्याबाबतच्या आदेशामध्ये नमूद अटीनुसार सामाजिक अंतराचे पालन करणे मास्कचा योग्य पद्धतीने वापर, हातांची  स्वच्छता आणि त्याचा वापर करणे यासह हार फुल खण नारळाची ओटी आदी बाबींना मनाई अशा विविध अटीवर मर्यादित पाच हजार  भाविक केवळ ऑनलाईन दर्शन पास असलेल्या  भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. 

गडावर जमावबंदी लागू करण्यात आलेला आहे. यात्रा रद्द करण्यात आलेली असून केवळ धार्मिक स्थळ भाविकांना दर्शनासाठी खुली अटी व शर्तींवर केलेली आहेत यामुळे मोहटादेवी गडावरील ज्योत आणणे, घटी बसणे भजन-कीर्तन यासह कावड, कलावंत यांच्या हजेऱ्या व मल्लांचा हंगामा  रद्द करण्यात आलेला आहे.

पिंपरी चिंचवड येथील भाविक राजेंद्र भोंडवे यांनी गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट लक्षवेधी केलेली होती. देवस्थान कर्मचाऱ्यांनी मंदिरात आकर्षक रोषणाई केल्यामुळे रात्री मंदिर रोषणाईने उजळून उजळले होता.

घटस्थापनेच्या वेळी भिमराव पालवे डॉ. ज्ञानेश्वर दराडे आजिनाथ आव्हाड अशोक विक्रम दहिफळे अशोक भगवानराव दहिफळे आदी विश्वस्त उपस्थित होते. 

देवी गडावर वाहने जाण्यास निर्बंध करण्यात आले आहे. तीन किलोमीटरवरील बीड रस्त्याच्या कमानीजवळ वाहने पार्किंग केलेली असल्याने भाविकांना पायी देवी गडावर यावे लागत आहे.

घटस्थापनेच्या कार्यक्रमाचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न नारायण देवा सुलाखे राजू देवामुळे भूषण साखरे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी स्वागत केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post