कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात महाराजस्व अभिनांतर्गत असलेल्या महसुली जनहितार्थ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुसूत्रता आणली जाईल असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, बांधकाम विभागाचे अमित निमकर उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, रज्जाक झारेकरी आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराजस्व व सप्तपदी सारखे अभियान गतिमान करून पोटखराबा क्षेत्र लागवडीखाली येण्यासाठी सर्व यंत्रणा काम सुरू आहेत.
५२ हजार गट पोटखराबा क्षेत्र असून यातील ४५ टक्के परिशिष्ठ भरून आले आहेत. तलाठ्यांच्यामार्फत पंचनामा गुगल इमेजेसच्या माध्यमातून ग्राह्य धरून डिसेंबर अखेरीस हे काम पूर्ण केले जाणार आहे.
यासह अतिक्रमित रस्ते उघडकीस आणून दफनभूमी, स्मशानभूमी यासाठी जागा उपलब्ध करून देणे, शाळांतील विविध दाखले शाळेत वाटप करून शिबिरांच्या माध्यमातुन विशिष्ठ समाजाचे दाखले ११इष्टकात भरून घेऊन ते वाटप केले जातील.
कोरोना काळात ज्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत देणे. धान्य वाटपात योग्य लाभार्थ्यांचा समावेश करणे, राज्यमार्ग ५१६ अ या महामार्गावरील जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याचे ९२टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाचा लवकरच निपटारा केला जाईल.
महसुली काम ग्रामीण भागात अधिक प्रभावी होण्याकरिता कर्जत-जामखेड तालुक्यात ४७ तलाठी कार्यालयांना इमारती उपलब्ध करून तलाठी आणि कृषी अधिकारी एकाच ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. असे प्रांताधिकारी डॉ. थोरबोले म्हणाले.
Post a Comment