कार्यक्रम भाजपाचा अन् चर्चा झाली राष्ट्रवादीची... भाजपाच्या पदाधिर्यांयांसह कार्यकर्त्यांमधून व्यक्त होतेय नाराजी...

नगर : जिल्ह्यातील महामार्गांचे भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन भाजपातर्फे करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमातून छाप भाजपाची  पडण्याऐवजी राष्ट्रवादीचा पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नाराज झालेले आहेत.


जिल्ह्यातील महामार्गांचे भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  यांच्या उपस्थिती झाला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन भाजपातर्फे करण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व कामांना निधीही केंद्राने दिलेला आहे. 

या कामाच्या रुपाने भाजपाला जिल्ह्यात चांगले वर्चस्व मिळविण्याची संधी चालून आली होती. या कार्यक्रमात आपल्यालाही बोलण्याची संधी मिळेल, अशी आशा काही नेत्यांना होती. परंतु सर्वांच्या आशेची निराशा झाली. भाजपाच्या नेत्यांना मिळणारी प्रत्येक संधी राष्ट्रवादीचे आमदार व नेत्यांना गेली.

भाजअसली या कार्यक्रमाच्या उदघाटनापासून ते आभारापर्यंतचे कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट केले होते. नियोजनात कोठेच काही कमी पडले नाही. मात्र कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना पाचारण करण्यात आले अन् कार्यक्रमाच्या कार्यक्रमावर नाराजीचे पडसाद उमठू लागले. ते पडसाद कार्यक्रमाच्या.दिवशाही उमटले होते. त्याचा भाजपाच्या नेत्यांना प्रामुख्याने अभ्यास केला नसेल मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याने मात्र केला आहे.

घरच्या कार्यक्रमात परत्यासारखे बसण्याची वेळ येथे भाजपाच्या पहिल्या फळीतील नेत्यांना दुसर्या फळीत तर काहींना पहिल्या फळीत बसायला जागा दिली असला तरी ती एका कोपर्याला दिली गेली. त्यामुळे अनेकजण नाराज झालेले आहेत.

भाजपाच्या नेत्यांच्या जागेवर स्थान दिले. मात्र राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हाय जँक केलेला करून स्वत:ची छाप उमठून टाकली. 

राष्ट्रवादीचे वर्चस्व राहण्याची चिन्हे अनेकांना दिसून आले. त्यामुळे अशा काहींनी कार्यक्रमाला येणे टाळले. काहींनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन घरी जाणे पसंद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post