नवी दिल्ली ः होय अनलिमिटेड पॅक आता ग्राहकांना मिळणार आहे. ही योजना जिओनेच अंमलात आणली आहे. जिओच्या ग्राहकांना आता कंपनी अनलिमिटेड डेटा पॅक कंपनी देणार आहे. त्यामुळे ग्राहक आनंदी झालेले आहेत. बुधवारी ग्राहकांना असुविधा मिळालेली होती.
दोन दिवसांपूर्वी रात्री व्हाॅटसअप, फेसबुक, इस्टाग्रामची सेवा अचानक बंद झाली होती. या सर्व सेवांना जागतिक आउटेजचा सामना करावा लागला. सुमारे सहा तासापेक्षा अधिक काळ ही सेवा बंद होती. राउटर्समधील दोषपूर्ण कॉन्फिगरेशन बदलण्यासाठी हे आउटेज झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती. त्यानंतर जिओच्या ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेटवर्क मिळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी न परवडणारी असल्याचे कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यामुळे रिलायन्स जिओने ग्राहकांना खूश करण्यासाठी आता दोन दिवसांचा अनलिमिटेड डेटा पॅक देण्याची घोषणा केली आहे.
बुधवारी सकाळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कलमधील जिओ ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेटवर्क मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने एक निवेदन जारी केले. काही ठिकाणी नेटवर्कची समस्या निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच कंपनीच्या टीमने काही तासांतच या समस्येचे निराकरण केले आहे.
सध्या जिओच्या सर्व सेवा पूर्णपणे कार्यरत असल्याची माहिती या निवेदनात दिली आहे. यशिवाय झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभावित ग्राहकांना दोन दिवसांचा अतिरिक्त अनलिमिटेड डेटा पॅक देण्याची घोषणा या निवेदनातून करण्यात आली आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार देशभरातून आउटेजच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, कंपनीच्या निवेदनात केवळ मध्य प्रदेश व छत्तीसगड सर्कलमधील ग्राहकांनाच फटका बसल्याचे म्हटले आहे. या आउटेजमागील कारणाचा अद्याप रिलायन्स जिओनं खुलासा केलेला नाही.
दोन दिवसीय कॉम्प्लिमेंट्री अनलिमिटेड डेटा देण्यासाठी कंपनी आउटेजनं प्रभावित झालेल्या ग्राहकांना एक एसएमएस पाठवणार आहे. त्यानंतर दोन दिवसांचा डेटा त्या ग्राहकाच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. सध्याचा सुरु असलेला प्लॅन संपल्यानंतर हा दोन दिवसांचा प्लॅन सुरु होईल.
त्याचा ग्राहकांना फायदा होणार आहे. हा निर्णय कंपनीने ग्राहकांची नाराजी टाळण्यासाठी घेतला असला तरी कंपनीकडून मिळालेल्या असुविधेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
Post a Comment