नगर : साहेबाच्या साहेबगिरीला असावी पण ती मर्यादीत असावी. ती साहेबगिरीला वाढली तर तिचा विपरित परिणाम होत असतो. अशाच.एका साहेबाच्या साहेबगिरीला सर्वजण कंटाळले आहेत. नको ती नोकरी अशी म्हणण्याची वेळ आता कर्मचार्यांवर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एका साहेबाच्या वागण्याला अन् बोलण्याला अधिकार्यांसह कर्मचारी कंटाळलेले आहे. एखाद्या चुकीबद्दल नको ते बोलणे ऐकण्याची वेळ सध्या सर्वांवर आलेली आहे. साहेबांच्या बोलण्याला ना असतो शेंडा ना असतो बुडूख... काम वेगळे चूक वेगळी बोलणे मात्र भलतेच असते. या बोलण्यालाच आता अधिकार्यांसह कर्मचाऱी वैतागले आहेत.
एखाद्या चुकीबद्दल कर्मचार्यांना साहेब बोलत असतात. पण त्या बोलण्याला काही तारतम्यही असतात. परंतु त्या साहेबांच्या बोलण्याला ना कुठले तारतम्य राहिलेले नाही. त्यांच्या मुखात कुठलाही शब्द कधी बाहेर येईल, हे सांगता येत नाही.
या बोलण्यालाच अनेकजण कंटाळले असून नको ती नोकरी अशी म्हणण्याची वेळ आता त्या कार्यालयातील अधिकार्यांसह कर्मचार्यांवर आली आहे. काही स्वत:चे महत्वाचे काम असतानाही साहेबाकडे जाणे टाळू लागले आहे.
पण साहेबाची सही महत्वाची असल्याने इच्छा नसतानाही काहींना त्या केबिनला जावे लागत आहे. काम कितीही फरफेक्ट केले तरी चूक साहेबाकडून निघत आहे. बोलणे खाऊन कर्मचारी माघारी येत आहे. चारचौघातील बोलण्याने कर्मचारी अपमानीत होत आहे.
नेहमीच्या साहेबाच्या सत्कारांना सर्वजण कंटाळले आहे. आज साहेब बोलणे सुधारतील अशी कर्मचारी करीत आहे. पण आजच्या पेक्षा कालचा दिवस बरा होता... असे केबिनच्या बाहेर आल्यावर कर्मचारी बोलत आहे.
साहेबगिरीला कधी थांबणार याचीच कर्मचारी प्रतीक्षा करीत आहे. साहेबाकडे फाईल सहिला घेऊन जायला अनेकजण आता टाळत आहे. परिणामी वेळेत होणारी कामे उशिरा होत आहे. वेळेत करून बोलणे खाण्यापेक्षा अवेळ कामे करून कर्मचारी बोलणे खाऊन चुकीची आज बोलणे मिळाल्याचे समाधान मिळत आहे.
साहेबाच्या या नेहमीच्या बोलण्याची काहींना सवय झाली आहे. तर काहीजण मानसिक तणावाखाली आल्याची चर्चाही आता कर्मचारी यामध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे साहेबांनी बोलणे अन् वागण्यात सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही स्थिती जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयातील आहे.
Post a Comment