जग थांबलं....

मुंबई : कोरोनामध्ये काही दिवस जग थांबलं होतं. तसंच आज जग थांबल आहे. कोरोनात मात्र करमणुकीचे समाज माध्यमाचे साधनं उपलब्ध होतं. त्यामुळे जग थांबूनही तसा फारसा फरक पडला नव्हता. मात्र आज समाज माध्यम थांबल्याने अखं जग थांबलं आहे.


जगभरात गेल्या काही तासापासून व्हॉटसअँप, फेसबुक व इंस्टाग्राम अचानक बंद झालं आहे.  हे तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याने नेटकरी वैतागले आहेत. त्यामुळे नेटीझन्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

पुढील काही तासांमध्ये या तीनही सेव्हा पूर्ववत होतील, असे सोशल मीडिया एक्सपर्टकडून सांगण्यात येत आहे. मात्र ते कधी सुरु होणार हे स्पष्ट नाही.

फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपचा वैयक्तिक आणि कार्यालयातील कामांसाठी वापर केला जातो. मात्र गेल्या काही तासांपासून अचानक या सेवा ठप्प झाल्याने कामांमध्ये अडचणी येत आहेत. 

रात्री जवळपास नऊ नंतर या तीनही अ‍ॅपची सेवा ठप्प झाली. व्हिडिऑ कॉल, चँट असे काहीच सेवा मिळत नसल्याचे युझर्सकडून सांगण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅपवरुन मेसेज सेंड किंवा रिसिव्ह होत नाही येत. हे तीनही सोशल मीडिया डाऊन झाल्याच्या काही मिनिटांनी नेटीझन्सना इंटरनेट कनेक्शनमुळे हा त्रास होत असल्याचं वाटत होतं. 

त्यामुळे अनेकांनी डेटा स्वीच ऑफ आणि ऑन करुन पाहिलं. मात्र त्यानंतर या तीनही  सोशल साईड्स डाऊन झाल्याचं समोर आलं. मात्र दोन तासापेक्षा अधिक वेळ होऊनही सेवा पुन्हा सुरु न झाल्याने नेटकरी हैराण झाले आहेत.

ही सेवा कधी सुरु होणार याची वाट पहात आहेत. वारंवार अनेक मोबाईल स्वीच ऑफ करून चालू करत आहे. काहींनी तर आपल्या मित्र व मैत्रीणींना फोन करून या सेवे बाबतची माहिती घेतली. त्यांचीही.सेवा बंद असल्याचे समजल्यानंतर नेटपँकची माहिती घेण्यात आली. त्यावरही कॉलवर चर्चा अनेकांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post