नगर ः कोरोनाचा आकडा कमी झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. बाधितांचा आकडा आज शंभरच्या आत आलेला आहे. त्यामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा सर्वांना लागलेली आहे. बाधितांचा आकडा कमी झालेला असला तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. त्यामुळे गर्दीत जाताना प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
आज (सोमवारी) जिल्ह्यात फक्त 97 बाधित आढळलेले आहेत. जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 34, खासगी तपासणीत 65, रॅपिड तपासणीत बाधित आढळलेले आहेत. गेल्या अनेक महिन्यातील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. या कमी आकडेवारीमुळे सर्वांना आनंद झालेला आहे. हा आकडा असाच कमी करायचा असेल तर सर्वांनी आता काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन केलेजात आहे.
दिवसभरात राहाता तालुक्यात 17, नेवाशात 12 व पारनेरमध्ये 11 जण बाधित आढळलेले आहेत. नगर शहरात सातजण बाधित आढळलेले आहेत.
बाधिताचा आकडा कमी झालेला असला तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे महत्वाचे आहे. ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी स्वतः हून येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment