पारनेर : पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रुत असताना गेल्या काही दिवसांपासून पर्जन्य राजाची कृपादृष्टी सुखकर झाल्यामुळे पारनेर तालुक्यातील अनेक गावातील पाझर तलाव व धरणे भरली आहे. काही भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
तालुक्याची जीवनदायिनी म्हणून समजले जाणारे, 399 दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असणारे व 2266 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार इतकी क्षमता असणारे मांडओहळ धरण ज्या धरणावर आज किमान अकराशे ते बाराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.
1983 साली तयार झालेले धरण या धरणाचा विस्तार किमान एक ते दीड किलोमीटर इतका आहे. या धरणामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या माळरान पडीक जमिनीला बागायती जमिनीचे रुप आले आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता श्री अशी माहिती उपविभागीय अभियंता व्ही . टी . शिंदे शाखा अभियंता ए. डी. मोरे तसेच सिंचन शाखा शाखा टाकळी ढोकेश्वर कडून देण्यात आली.
नोव्हेंबर 2019-202O-2O21 या मागील तीनही वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्याचे जलपूजन ही पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले होते. रविवारीही या जलपूजन समारंभासाठी आमदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शविली व जलपूजन केले .
विधानसभा निवडणूक प्रचार सभेत निलेश लंके हे वारंवार सांगत होते की पारनेर तालुक्यातील अनेक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार व निवडणुकीचा निकाल लागला.त्या दिवशी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले व त्या वेळीही आमदार निलेश लंके यांनीच जलपूजन केले होते.
ऑगस्ट 2020 मध्येही ही हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच सहा ऑक्टोबर 2021 रोजीही हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचे जलपूजनही आमदार लंके यांच्या हस्ते झाले.
शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आले लोकप्रतिनिधीचा पायगुण तालुक्यासाठी चांगला आहे असा शेतकरी बांधवांमध्ये विनोदाने चर्चेचा विषय होत आहे. सदर जलपूजन कार्यक्रमास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जलपूजन समारंभ संपन्न झाला.
आमदार निलेश लंके यांच्या समवेत बापू शिर्के,अशोक कटारीया,प्रशांत गायकवाड , अशोक , बाळासाहेब खिलारी , राहुल झावरे अरुण आंधळे व्ही. एस. उंडे, अंकुश पायमोडे, शशिकांत आंधळे, श्रीकांत चौरे , डॉक्टर कावरे, संदीप चौधरी, गुलाबराव पाटील , अशोक पवार, रामदास दाते, सोमनाथ आहेर , अशोक पवार , लहू धुळे, झुमराबाई आंधळे , वर्षा मुळे , जगदाळे सर , जनाबाई आंधळे , प्रकाश गाजरे , पांडुरंग जाधव , उमाताई बोरुडे , मयुरी औटी , दिपाली औटी , शिवाजी व्यवहारे , संजीव भोर , पियुष गाजरे पोपट गुंड , अजित भाईक , बाळासाहेब शिंदे , सुभाष शिंदे , गुलाब राजे भोसले, आदी उपस्थित होते.
Post a Comment