नगर ः माहेरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आलेला आहे. या त्रासाला कंटाळून विवाहितेने जामखेडमधील सासरच्या नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत विवाहिता (रा. बेलवंडी स्टेशन. ता. श्रीगोंदा. हल्ली रा. हळगाव, ता. जामखेड) हिचे 2013 मध्ये लग्न झाल्यानंतर सासरी बेलवंडी स्टेशन (ता. श्रीगोंदा) या ठिकाणी राहात होती.
सासरची मंडळी विवाहितेला घर बांधणे व पोल्ट्री फार्मच्या शेडसाठीच्या कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये, असे बोलून तिचा वारंवार छळ करत होते. अखेर यास कंटाळून पिडीत विवाहित महिलेने जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरुन सासरकडील एकूण नऊजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पती सतीश महादु लाढाणे,अनिल महादु लाढाणे (दीर), महादू किसन लाढाणे (सासरा), हौसाबाई महादु लाढाणे (सासू) तसेच उषा अनिल लाढाणे, किसन बाळू लाढाणे व आणखी एक (सर्व.रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) आणि चांगुणाबाई बबन कापसे, बबन बापू कापसे (दोघे रा. हळगाव, ता. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक साठे करत आहेत.
Post a Comment