मुंबई ः ऐन सणासुदीच्या काळात सोने अन् चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असते. अशा परिस्थितीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मंगळवारी डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव आज 0.12 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी, चांदीचे भाव 0.26 टक्क्यांच्या घसरण झाली आहे.
मागील वर्षी याच कालावधीत मल्टी कमोडिटी एक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,141 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोने रेकॉर्ड पातळीपेक्षा 8059 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या भावात आज 0.12 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे सोने 48,141 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.26 टक्क्यांनी घसरली. आज एक किलो चांदीचा भाव 65,964 रुपये आहे.
त्यामुळे या संधीचा लाभ आता सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सोने आणखी आगामी घसरते की वाढते, हे तूर्ततरी सांगता येत नाही.
Post a Comment