नगर ः केडगावमधील अंबिकानगर व वाणीनगर येथे हाय प्रोफाईल देह विक्री करणाऱ्या रॅकेटचा आज पडदाफाश करण्यात आलेला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकला. तीन पीडित परप्रांतीय महिलांची सुटकार पोलिसांनी केलेली आहे.
केडगाव पोलिसांना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाणी नगर तसेच कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हद्दीतील अंबिका नगर केडगाव परिसरात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 03 पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दीपक एकनाथ लांडगे (वय 30) व सागर जाधव या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या दोघांविरुध्द विरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली.
पोलिस नाईक शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आलेली आहे.
एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. या दोन्ही कारवायांची वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल देहविक्री व्यवसाय करून घेतला जात होता.
अहमदनगर शहरामध्ये बऱ्याच काळानंतर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमुळे अहमदनगर शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथखाने ही कारवाई केली आहे.
Post a Comment