राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलने...

एम.  व्ही. देशमुख

नगर : राज्य व केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी व मतदानासाठी सध्या विरोधक आंदोलने करीत आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करून आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकरी कांदा, दूध व इतर प्रश्नावर आंदोलने करतात, तेव्हा मात्र हीच विविध पक्षाची मंडळी आपले हित पाहून परिस्थितीनुसार निर्णय घेतात. प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होत नाही.


केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन शेतकर्यांनी आंदोलन हाती घेतलेले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील अनेक राज्यात आंदोलने झालेली आहे. प्रत्यक्षात मात्र या आंदोलनात कोणत्याही पक्षाने सक्रीय सहभाग घेतलेला नाही.

केंद्र व राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी आता सध्या आंदोलने हाती घेण्यात आलेली आहे. ही सर्व आंदोलने सत्ताधाऱ्यांच्याविरोधात केली जात आहे. मात्र हीच मंडळीने शेतकऱयांनी पुकारलेल्या आंदोलनाला मात्र पाठिंबा देत नाही.

विशेष म्हणजे शेतकरी संघटना व इतर सामाजिक संस्थांनी स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा दिलेला आहे. त्यांनी फक्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केलेले आहे. कोणत्याही पक्षाला शेतकरी प्रश्नावर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलेले नाही.

परंतु शेतकर्यांना वीज बिल माफ व्हावे, अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळावी, शेतकऱी विरोधी कायदे रद्द करावे, यासह विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारमधील आंदोलने हाती घेऊन शेतकर्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केलेले आहे. या आवाहनावरूनच आता शेतकऱ्यांंकडून विविध टीका टिपन्नी केली जात आहे.


शेतकर्यांसाठी लढायचे आहे, तर राज्यातील प्रश्न शेतकऱ्यांचे सोडवा मगच आंदोलने करा, तसेच केंद्राविरोधात आंदोलन हाती घेण्यात यावे, मत काहींनी समाज माध्यमावर व्यक्त केले आहे. काहींनी महाविकास आघाडीचा हाच मुद्दा पकडत तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल उपस्थित केला आहे.  

कांद्याच्या भावात नेहमीच उतारचढ होते. भावात घसरण झाल्यानंतर अनेकदा शेतकरी आंदोलने करतात, त्या वेळी एकही पक्ष त्यांच्या बाजुने उतरत नाही. मग आता राजकीय पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी का सहभागी व्हावे, असा तेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. तशी मतेही आता शेतकऱ्यांमधून समाज माध्यमावर व्यक्त केली जात आहे.

राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच शेतकर्यांचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे फक्त भांडवल केले जाते. प्रत्यक्षात कोणीच पुढे येत नाही. राज्यात व केंद्रात प्रत्येक पक्षाचे सरकार येऊन गेले आहे. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न स्वातंत्र्यापासून आजही तसेच आहेत. 

त्याचा आता शेतकऱ्यांनी विचार करून पुढचे पाऊल टाकावे. राजकारणासाठी होत असलेला आपला वापर टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post