बिबट्यासाठी पिंजरा घेऊन या आम्ही ठिकाण दाखवतो...

राहुरी : तालुक्यातील गडाख वस्ती येथे दुचाकीवर ड्रमने पाणी घेऊन घरी निघालेल्या तरुणावर घासात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली. पण दुचाकीवरून खाली पडून झालेल्या आवाजाने बिबट्या माघारी फिरला. 

राहुरी तालुक्यातील वांबोरी


त गडाख वस्ती भागात बिबट्याचा वावर आहे. यापूर्वी कुत्रे, शेळ्या, कोंबड्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर पथदिवे नसल्याने अंधार आहे. शिवाय माणसावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना झाल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. 

बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विकास संभाजी गडाख (रा. गडाख वस्ती कुक्कडवेढे रोड वांबोरी) ड्रममध्ये पाणी घेऊन मोटारसायकलने त्यांच्या घरी जात होते. गाडीची गती कमी असताना घासाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने विकासवर हल्ला चढवला.

बिबट्याचा जोरदार धक्का गाडीला लटकवलेल्या ड्रमला लागून गाडी पडली. गाडी पडताना झालेला जोरदाराच्या आवाजाने व विकासने आरडाओरड केल्यानंतर बिबट्या माघारी फिरला. त्यामुळे
मोठा अनर्थ टळला. या घटनेत विकास गडाख यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. यानंतर गडाख कुटुंबियांनी वनविभागाला कळवल्यानंतर वन अधिकार्‍यांनी पिंजरा तुम्हीच घेऊन या, आमचा माणूस ठिकाण दाखवील, तेथे पिंजरा लावा, असा सल्ला दिला. या अजब सल्ल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post