राजकीय वातावरण ढवळलं.. विरोधकांना चौकशांच्या फेर्यात अडकवलं...

मुंबई ः राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर रहावे लागल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे. इडी, इन्कम टॅक्स आदी चौकशांचा ससेमिरा आता विरोधकांच्या मागे लावून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न सध्या केंद्राकडून होत असल्याचा आरोप काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेकडन केला जात आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून विरोधकांच्या मागे चौकशांचा फेर्या लावण्यात आलेल्या आहेत.


राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस  व शिवसेना एकत्र आलेली आहे. या तीनही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करून राज्याचा कारभार सुरु केलेला आहे. हा मुद्दा भाजपाच्या जिव्हारी लागलेला असल्याचे मत आता राजकीय नेत्यांमधून व्यक्त केले जात आहे.

राज्यात सत्ता स्थापन न करता आल्यामुळे आता भाजपाकडून सत्ताधारी आघाडीतील नेत्यांना अडचणीत आणून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुुरु केला आहे. जे भाजपाच्या आश्वासने व बोलविण्याला साथ देत नाही, अशा सर्वांच्या आता वेगवेगळ्या चौकशा सुरु झालेल्या आहेत.

त्याबरोबर काही मंत्री व विद्यमान आमदार व माजी खासदार व आमदारांच्या चौकशा सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये इडी, इन्कम टॅक्स आदी चौकशांचा ससेमिरा राज्यातील राजकीय नेत्यांच्या मागे लागलेला आहे. विशेष म्हणजे या सर्व चौकशा राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांच्या होत आहे. यामध्ये भाजपाचा एक नेता नाही. 

त्यामुळे या चौकशांचा फेरा हा राजकीय हेतून होत असल्याचा आरोप सध्या भाजपाविरोधी सर्व गटांकडून होत आहे. भाजपाने राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावे. चौकशांचा फेरा नेत्यांमागे लावून सत्ता मिळविण्याचा केविलवाणी प्रयत्न थांबविण्याची मागणी राज्यभरातील आघाडीतील नेत्यांकडून होत आहे.

सत्ता मिळाली नाही म्हणून राजकीय नेत्यांसह त्यांच्या रक्तातील नात्यांनाही त्रास देण्याचा सुरु झालेला प्रयत्न त्वरीत थांबवावा, हा प्रकार चुकीचा असून त्याविरोधात आता जनताच भाजपाला धडा शिकविल, असे मत व्यक्त होऊ लागलेले आहे.

राज्यातील नेत्यांनी जर गैरव्यवहार केलेले होते, तर त्याच्या मागील पाच वर्षात चौकशा का झाल्या नाहीत. त्या का थांबविण्यात आल्या होत्या. आताच नेमक्या कशा चौकशा सुरु झालेल्या आहेत, असा थेट सवालही आता शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या नेत्यांमधून व्यक्त केला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post