नगर : मुळा एज्युकेशन सोसायटीमधील कर्मचारी प्रतिक बाळासाहेब काळे (रा. तेलकुडगाव ता. नेवासा) यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी रविवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली.
महेश गोरक्षनाथ कदम, राहुल जनार्धन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
दरम्यान, याप्रकरणी विनायक दामोदर देशमुख याला रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या चौघांना आज (सोमवारी) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
प्रतिक याने वरिष्ठ सहकार्यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेतला होता. मयत प्रतिक याची बहिण प्रतिक्षा हिच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचा एमआयडीसी पोलिस तपास करत आहे. या प्रकरणातील सात आरोपींपैकी तीन आरोपी पसार असून आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Post a Comment