नगर : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या शासकीय वाहनाने आज सायंकाळी सव्वापाच ते साडेपाचच्या सुमारास अचानक पेट घेतला. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हे दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून शासकीय वाहनाने जिल्हा रुग्णालयात आले. त्यानंतर काही वेळाने ते आपल्या खाजगी वाहनाने पुन्हा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात गेले.
त्यानंतर काही वेळातच रुग्णालयाच्या दर्शनी भागात उभ्या केलेल्या शासकीय वाहनाच्या बोनेट मधून धूर त्यानंतर लगेच आग दिसून आली. बघता बघता वाहनाच्या पुढील भागातून आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. अचानक वाहनाला आग लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली.
या दरम्यान रुग्णालयात असलेल्या इमर्जन्सी फायर सेफ्टी वायूचा मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. तसेच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशामक दलाने घटनास्थळी येत आग अटोक्यात आणली.
ही आग विजवण्याकामी रुग्णालयाचे डॉ. मनोज घुगे, कर्मचारी प्रकाश पवार, सागर गायकवाड, भरत काशीद, संजय हंकारे, राहुल माने, प्रदीप ससे, अरविंद सोनवणे आदींनी प्रयत्न केले.
या घटनेत शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्या मुळे आग लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Post a Comment