पुणे : शिकवणी घेणार्या एका शिक्षकाने आपल्या कृत्याने सर्वांना बदनाम करण्याचे काम केले आहे. सर्वच स्तरातून शिक्षकाच्या कृत्याचा जाहीर निषेध होत असून त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
पुण्यातील वानवडी परिसरात एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
नराधम आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला आहे.
मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पीडितेच्या आई-वडिलांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात जात 52 वर्षीय नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
वानवडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्या आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
Post a Comment