मुंबई : आमदार नीतेश राणेंना जेल की बेल होणार या फैसला आज दुपारी 3 वाजल्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयात होणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातलीय. त्याच पार्श्वभूमीवर महाआघाडीचे प्रचारप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली.
त्यातला एक जण हा नीतेश राणेंच्या स्वाभिमानचा पुण्यातील कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. हा हल्ला नीतेश राणे आणि गोट्या सावंत या दोघांच्या सांगण्यावरुन केल्याचा आरोप फिर्यादी संतोष परब यांनी केलेला आहे. नीतेश राणे हे सध्या तरी गायब आहेत.
Post a Comment