श्रीरामपूर : नायजेरिया श्रीरामपुरात आलेले मायलेकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
त्यांच्यावर श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघांचेही सॅम्पल ओमियोक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
नायजेरियाहून आलेली 40 वर्षीय आई व तिचा सहा वर्षाचा मुलगा हे दोघे श्रीरामपूर येथे शहरातील शिवाजीरोड परिसरात आले. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास मिळताच त्यांनी या दोघांची कोरोना चाचणी केली असता या दोघांचेही अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यानुसार या दोघांनाही उपचारासाठी श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Post a Comment