नवोदय विद्यालयातील बाधितांची संख्या वाढली...

पारनेर : टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील कोरोना रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे. बाधितांचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी नवोदय विद्यालय परिसर कॅन्टोनमेंट झोन जाहीर केला. तीन दिवसांपूर्वी 19 जण कोरोना बाधित झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यात आणखी 32 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत.

नवोदय विद्यालयामध्ये 460 विद्यार्थी आणि 51 शिक्षक आणि कर्मचारी आहेत. सध्या 307 विद्यार्थी या ठिकाणी निवासी आहेत. तर 48 कोरोना बाधीत विद्यार्थ्यांना उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृतीत उत्तम असल्याचे सूत्रांकडून समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post