नगर : सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली. ही घटना शहरातील सावेडी उपनगरात शुक्रवारी (24 डिसेंबर) रोजी घडली.
रोहिणी प्रशांत बुर्हाडे (वय 27) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुर्हाडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी रोहिणीचा विविध कारणांसाठी छळ सुरू केला.
या छळाला कंटाळून रोहिणी हिने शुक्रवारी राहत्या घरात आत्महत्या केली, अशी फिर्याद रवींद्र डहाळे यांनी दिली आहे.
या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी प्रशांत बुर्हाडे (पती), संतोष (सासरा) आणि सुनिता (सासू) या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
Post a Comment