शिर्डी : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 100 पार गेली आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहे.
दुसरीकडे, लाखो भक्तांचे शक्तीस्थळ असलेले शिर्डीतील साई मंदिराच्या नियमात बदल करण्यात आले आहे. यापुढे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मंदिरात प्रवेश असणार आहे.
शिर्डी साई संस्थानच्या वतीने साईदर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. यापुढे मंदिरात सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत दर्शन मिळणार आहे.
त्याचबरोबर, पहाटेच्या काकड आरतीत भाविकांना प्रवेश नसणार आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत काकड व शेजारती पार पडणार आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शिर्डी साई मंदिरामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Post a Comment