पारनेर मध्ये कांद्याला मिळाला इतका भाव....

पारनेेर : येथील पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव रविवारी करण्यात आले.  रविवारी येथे सुमारे 34 हजार 536 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2200 ते 2700 प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. 


कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्‍यांमधे समाधानाचे चेहर्‍यावर भाव होते. पारनेर बाजार समितीत 34 हजार 536 कांदा गोण्यांची आवक झाली होती.

कांद्याला असा.मिळाला भाव : एक नंबर कांद्याला 2200 ते 2700, दोन नंबर कांद्याला 1300 ते 2100, तीन नंबर कांद्याला 600 ते 1200, चार नंबर कांद्याला 100 ते 500 पतर जुन्या कांद्याला 1000 ते 3300 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. 

शेतावर कांदा विक्री करताना शेतकर्‍यांनी फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपला कांदा बाजार समितीमध्ये विकावा असे आवाहन पारनेर बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post