तरुणीवर अत्याचार...

नगर : तरूणीवर विवाहित पुरूषाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी बापू बाबासाहेब मुठे (रा. भिंगार) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नगर तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी 22 वर्षीय असून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 23 डिसेंबर 2021 च्या रात्री नऊ ते 24 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान देवगाव (ता. नगर) येथील रिसॉल्टवर ही घटना घडली.

बापू मुठे हा फिर्यादी तरुणीला धमकी देऊन देवगाव येथील रिसॉल्टवर अत्याचार केले. पहिली पत्नीला घटस्फोट देऊन तरुणीसमवेत लग्स करण्याचे आमिष दाखविले. 

पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बापू मुठे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक पुढील तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post