नगर : केंदीय मानवाधिकार संघटन केंद्र नवी दिल्ली यांचे वतीने मानवाधिकार दिनी डॉ. सिकंदर अजिजभाई शेख यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथे अहमदनगर जिल्ह्यातील सिकंदर शेख आर.एस.पी अधिकारी शिक्षकांचा उच्च स्तर न्यायाधिश अभिजीत देशमुख यांनी केलेल्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलींद दहिवले यांच्या हस्ते डॉ. सिकंदर अजिजभाई शेख नवजीवन विद्यालय दहिगावने (ता. शेवगाव)चे शिक्षक हे शैक्षणिक उपक्रमाबरोबरच जनसामान्यांच्या सेवेकरिताही कार्य करत असल्याने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास संजय पांडे (वरिष्ठ पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक नागपूर), डॉ. कुमेश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष मानवाधिकार संघटन), दिपक कदम ( फिल्म निर्माते मुंबई ) अँड . संजय कुस्तवार (अधिवक्ता , सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया , नवी दिल्ली ) प्रकाश भागवत( मराठी सिने अभिनेता मुंबई ) अश्विनी चंद्रकापूरे (मराठी सिने अभिनेत्री मुंबई )सह अनेक मान्यवरांच्या उपस्थित मानवाधिकार दिनाचा साई सभागृहात कार्यकम संपन्न झाला.
RSP अधिकारी शिक्षकाचे मा.आ.डाॅ.श्री नरेंद्र घुले पाटील, मा.आ.श्री.चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना, राजश्रीताई घुले पदवीधर आमदार डॉ . सुधिर तांबे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डाॅ. श्री.क्षितीजभैय्या घुले पाटील, नेवासा पंचायत समितीचे सभापती श्री रावसाहेब कांगुणे प.स.सदस्य श्री बाळासाहेब सोनवणे, सौ.झगडे ताई, शिक्षणाधिकारी श्री कडूस, मा.शिक्षणाधिकारी श्री. दिलीप थोरे, प्र.अधिकारी प्रा.श्री.के.वाय.नजन, प्राचार्य श्री.अशोक उगलमुगले, उपप्राचार्या कणसे सर,पर्यवेक्षक श्री.टी.एम.घुले,मा.चेअरमन श्री.काकासाहेब घुले , शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव श्री सुनिल गाडगे , जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप ,प्रा. महेश पाडेकर,जिल्हा कार्यवाहक श्री संजय भुसारी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, शेवगाव तालुका अध्यक्ष श्री कैलास जाधव, जिल्ह्यातील सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक यांनी अभिनंदन केले आसून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment