नेप्तीत आवक आवक टिकून भावाचं...

नगर : दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत लाल कांद्याला 2800 रुपयांचा तर गावरान कांद्याला तीन हजार प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. 


नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या गावरान कांद्याच्या 12 हजार 768 कांदा  गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कांद्याला सुमारे 3000 रुपयांचा भाव मिळाला आहे.  

गावरान कांद्याचे  प्रतवारीनुसार भाव - एक नंबर कांदा ः 2200 ते 3000, दोन नंबर कांदा ः 1500 ते 2200, तीन नंबर कांदा ः 700 ते 1500, चार नंबर कांदा ः 300 ते 700.

लाल कांद्याच्या 74 हजार 501 गोण्यांची  आवक झाली. यामध्ये कांद्याला सर्वाधिक भाव 2800 रुपयांचा मिळाला.  लाल कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 2150 ते 2800, दोन नंबर कांदा ः 1450 ते 2150, तीन नंबर कांदा ः 750 ते  1450, चार नंबर कांदा ः 200 ते 750. 

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post