सभासदांसमोर व्हीजन मांडले...


नगर ः आम्ही केलेल्या स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे तसेच पुढील काळात करावयाच्या विविध योजनांचे व्हिजन आम्ही सभासदांपुढे मांडलेले आहे. संस्थेच्या चेअरमन निवडी बिनविरोध झाल्या की, मतदान घेवून. या निवडीत कोणत्या संचालकाने काय भूमिका घेतली यात सभासदांना काहीच स्वारस्य नाही. त्यांना फक्त संचालकाने संस्था आणि सभासद हिताला बाधा आणली का? हे महत्वाचे आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही घसा कोरडा केला तरी सर्व  सभासद सुज्ञ असून  ते  जय श्री गणेश पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करतील असा विश्वास संजय कडूस यांनी व्यक्त केला.

जय श्री गणेश पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. जय श्री गणेश पॅनलच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. यावेळी  जय श्री गणेश पॅनलचे उमेदवार प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, डॉ.दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्निल शिंदे, ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, . सुरेखा महारनुर,.मनिषा साळवे आदी उपस्थित होते.

जोर्वेकर म्हणाले की, निवडणूक रिंगणात असलेल्या विरोधी पॅनलची अवस्था तर अतिशय केविलवाणी झाली आहे. त्यांनी अगोदर आमच्यातील ३ उमेदवार आयात केले.

त्यानंतर जिल्हा परिषदेतील सेवेची फक्त दीड, दोन आणि अडीच वर्ष बाकी असलेल्या एक नव्हे तर ४-४ जणांना उमेदवारी दिली आहे. जर कदाचित ते निवडून आले त्यांची सेवा संपल्यावर दोन आणि अडीच वर्षात पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.

सहकार कायद्याच्या नियमातील तरतुदीनुसार संचालक मंडळाच्या कार्यकाळात फक्त २ जागा संचालक मंडळ सभेत भरता येतात. त्यामुळे २ जागांसाठी पोटनिवडणूक अटळ आहे. त्यामुळे कमी सेवा राहिलेले ४ उमेदवार देवून विरोधी पॅनलने कोणते संस्था व सभासदहित पहिले? असा सवाल अरुण जोर्वेकर यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post