पराभव दिसू लागल्याने विरोधकांकडून संघटनांत फुट पाडण्याचा प्रयत्न


नगर - कर्मचारी संघटना आणि संस्थेची निवडणूक या दोन वेगवेगळ्या बाबी असतानाही विरोधकांकडून आरोग्यासह विविध कमर्चारी  संघटनांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे, ही अतिशय चुकीची बाब असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे पाप कोणी करू नये. निवडणूक २ दिवसांची आहे, पण संघटना ही आपल्या आयुष्यभरासाठी आपल्या अडचणी सोडविण्याचे माध्यम आहे, त्यामुळे विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी याचे भान ठेवावे असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक व जय श्री गणेश पॅनलचे अकोले सर्वसाधारण मतदार संघातील उमेदवार विलास शेळके यांनी केले आहे.

जय श्रीगणेश मंडळाच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. या वेळी  जय श्री गणेश पॅनलचे उमेदवार प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, डॉ. दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्निल शिंदे, ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, सुरेखा महारनुर, मनिषा साळवे आदी उपस्थित होते

शेळके म्हणाले,  जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधी पॅनलमधील काही उमेदवारांनी मागील वर्ष - दीड वर्षात संघटनेची पदे घेतली. 

या पदांचा वापर आता निवडणुकीसाठी करत आहेत. आता शेवटच्या टप्प्यात तर त्यांनी आरोग्यासह सर्वच संघटनांत फुट पाडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप विलास शेळके यांनी केला आहे. 

शेळके म्हणाले की, आपण गेल्या २० - २५ वर्षांपासून संघटनेत विविध पदांवर काम करताना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघर्ष केला. पण कधीही निवडणूक लढविली नाही. 

पण काहींनी संघटनेच्या पदांचा वापर निवडणुकीसाठी करायला सुरुवात केल्यानंतर सभासदांच्या आग्रहाखातर पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. असे सांगत विरोधी पॅनलने हे पाप करू नये असे आवाहन त्यांनी केले. 

तसेच विरोधकांनी कितीही संघटना फोडण्याचा प्रयत्न केला तरी सभासद सुज्ञ आहेत ते विरोधकांचा डाव यशस्वी होऊ देणार नाहीत असा विश्वासही शेळके यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post