नगर ः विरोधकांनी जाहीरनाम्यात संस्थेच्या जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता विकत घेवून शॉपिंग मॉल बांधण्याची घोषणा केली आहे. यात कुठलेही सभासद हित नाही तर या खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार करून पैसे खाण्याचा यांचा डाव असल्याचा आरोपही अरुण जोर्वेकर यांनी केला आहे.
जय श्री गणेश मंडळाच्या प्रचारादरम्यान ते बोेलत होते. यावेळी जय श्री गणेश पॅनलचे उमेदवार प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजु दिघे, डॉ.दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्निल शिंदे, श्रीम.ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, श्रीम. सुरेखा महारनुर, श्रीम.मनिषा साळवे आदी उपस्थित होते.
जोर्वेकर म्हणाले की, विरोधी पॅनलने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूकीचे सोपस्कार पूर्ण करणारा आहे, त्यात त्यांनी संस्था व सभासद हिताचे कुठलेली व्हिजन मांडलेले नाही. ते जे करणार आहेत असे सांगतात ते आम्ही अगोदरच करून दाखवले आहे. त्यांचा सभासद कल्याण निधीला विरोध आहे.
मात्र जाहीरनाम्यात मयत सभासदांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करतात, ते कसे करणार याचा कुठेही उल्लेख नाही. केवळ ढगात गोळ्या मारण्याचे काम ते करत आहेत. आम्ही मात्र संस्था व सभासद हितासाठी काय केले आणि पुढे काय करणार याची सविस्तर माहिती आमच्या वचनपुर्ती व भविष्याच्या संकल्पनाम्यात सभासदांना दिली असल्याचे अरुण जोर्वेकर यांनी सांगितले.
Post a Comment