श्रीगोंदा, पारनेर, राहुरी अन् संगमनेरात चिंता

नगर ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज (मंगळवारी) 45 आला आहे. यामध्ये श्रीगोंदा, पारनेर, राहुरी अन् संगमनेरात चिंता कायम आहे.


कोरोनाचा आकडा सध्या कमी जास्त होत असला तरी आज मात्र बाधितांच्या आकड्यात घट झालेली आहे. आज अवघे 45 बाधित आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या तपासणी अहवालात 20, खासगी तपासणीत 17 तर रॅपिड चाचणीत आठ जण बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये श्रीगोंद्यामध्ये सर्वाधिक आठ रुग्ण आढळून आलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण पारनेरमध्ये एकूण सात आढळून आलेले आहेत. 

राहुरीसह संगमनेरात  तिसर्या कर्मचांकाची बाधितांची आकडेवारी सापडली आहे. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी पाच रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र सध्या कोरोना नियमांना हरताळ फासला जात असल्याचेचित्र दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post