श्रीगोंदा : सहाय्यक कॄषी अधिकारी म्हणून आढळगाव चा पदभार घेतल्यानंतर आढळगावमधील शेतकरी वर्गाला कोट्यवधी च्या योजनांचा लाभ दिल्याबद्दल शेतकर्यांनी प्रमोद देवकाते यांचा सत्कार केला.
आढळगाव येथे तीन वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातून बदलून आल्यावर देवकाते यांना आढळगाव चा पदभार देण्यात आला. सुरुवातीला देवकाते यांनी कामकाज करताना शेतकरी वर्गात एकरुप होऊन कामे सुरू केली.
शेतकऱ्यांना शेततळे, फळबाग लागवड, ठिबक सिंचन योजना, कांदा चाळ, यांत्रिकीकरण आदी योजनांची सविस्तर माहिती देवून योग्य मार्गदर्शन करुन शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात लाभ दिला. त्यामुळे आढळगाव येथील शेतकर्यांनी प्रमोद देवकाते यांचा सत्कार केला.
यावेळी माजी उपसरपंच किसन शिंदे, बापुराव जाधव, संदीप काळाणे, साहेबराव शिंदे, संतोष सोनवणे, भाजपाचे युवा सरचिटणीस सतीष काळे आदी उपस्थित होते.
Post a Comment