वडनेर : पानरे तालुक्यातील वडनेर बु सोसायटीची निवडणूक शनिवार दि. 26 फेब्रुवारी रोजी पार पडली. 857 सभासद असलेल्या या निवडणुकीत 813 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
आ. निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुनील बाबर आणि संजयदादा बाबर या युवा सहका-यांच्या नेतृत्वाखालील गुरुदत्त ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीत एक हाती बाजी मारून विरोधी गुरुदत्त सहकार पॅनलचा धुव्वा उडवला गुरुदत्त ग्रामविकास पॅनलचे सर्वच सर्व 13 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
या सर्व विजयी उमेदवारांचे आ.निलेश लंके यांनी अभिनंदन केले आहे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघ- दिलीप चौधरी 498 अनंथा जगदाळे 493 लक्ष्मण बो-हाडे 480 खंडू बोचरे 442 दिनेश बाबर 426 दादाभाऊ थोरात 417 काशीनाथ वाजे 405 जालिंदर येवले 389 महिला प्रतिनिधी मतदार संघ लंकाबाई बाबर 479 सिंधूबाई बाबर 451,अनु जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघ अशोक वायदंडे 474, इतर मागासवर्ग प्रतिनिधी मतदारसंघ भाऊसाहेब(बाबाजी) बाबर-450
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघ भाऊसाहेब मेचे 475 याप्रमाणे विजयी उमेदवारांना मते मिळाली विजयाची घोषणा होताच विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विजयी सभेचे आयोजन करून सर्व सभासदांचे आभार व्यक्त करण्यात आले.
निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी टी. एस. भोसले सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी जे. डी. पवार, दादासाहेब पुंड, रामदास भोसले, भास्कर मगर, संतोष चौधरी, विठ्ठल बेलोटे, मनेश बेलोटे, आरिफ तांबोळी, राजेश गोपाळे, राजेंद्र खामकर, बाळू पठारे, मंगेश सुपेकर, सगजी जाधव यांनी पाहिले पोलीस कर्मचारी श्री गायकवाड व श्री कडूस यांनी या निवडणूक कामी चोख बंदोबस्त ठेवला.
Post a Comment