प्राथमिक बँकेच्या निवडणुकीची मे अन् जूनमध्ये रणधुमाळी....

नगर : जिल्हा प्राथमिक बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी मे अन् जून महिन्यात होणार आहे. याच दरम्यान नवीन संचालक मंडळ सत्तेत येणार आहे.


जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची मागील निवडणूक २८ फेब्रुवारी २०१६ झालेली होती. त्यामुळे शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत २८ फेबुवारी २०२१ ला संपलेली आहे. परंतु कोरोणाने लांबवणीवर पडलेल्या होती.

या संधीचा फायदा घेत बँकेत संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्ष करण्यात आले. तीन महिन्याला या निवडी करण्यात आल्या. त्यामुळे सभासदांमधून या कारभावर नाराजी व्यक्त करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी २९ मार्च २०२२ काढलेल्या आदेशामुळे शिक्षक बँकेची निवडणूक होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.

कालच्या आदेशाने एक जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ज्या संस्थाच्या मुदती संपत आहेत. अशा सहकारी संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया एक एप्रिल २०२२ पासून सुरू करून ३१ जुलै २०२२ अखेर पूर्ण करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत.

ऐन उन्हाळ्यात ही निवडणूक होत असल्याने शिक्षक नेत्यांचा चांगलाच घाम निघणार आहे. शिक्षक मतदार सुट्टीला जाणार असल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी शिक्षक नेत्यांची चांगली दमछाक होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post