बाळासाहेब नाहाटा यांची येथे लागली वर्णी...

नगर : श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांची नगर-नाशिक विभागातून महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


या संघाची तीन वर्षांपूर्वी निवडणूक झाली झाली होती. मात्र, नागपूरचे गोपीचंद पांडे यांनी दुर्बल घटक मतदार संघाची एक जागा कमी केल्याच्या कारणावरून राज्य बाजार समिती संघाच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालयाने मतमोजणीला स्थगिती दिली होती. तीन वर्षांनंतर गोपीचंद पांडे यांनी याचिका मागे घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एन. व्ही. आघाव यांनी निवडणुकीचा रविवारी निकाल जाहीर केला. यामध्ये नगर नाशिक विभागातून बाळासाहेब नाहाटा हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.

नाहाटा यांना राज्य बाजार समिती संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संधी दिली. त्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांनी प्रयत्न केले होते. दिवंगत शिवाजीराव नागवडे, घनश्याम शेलार यांच्यानंतर नाहाटा यांना राज्यपातळीवरील सहकारी शिखर संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post