श्रीगोंदा : तालुक्यातील निमगावखलू येथून दौडला शाळेत चाललेल्या बहीण व भावाचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळ सकाळी नऊच्या सुमारास घडली. अनुष्का शिंदे ( वय १६) व आदित्य शिंदे (वय १४) दोघे निमगाव खलू अशी अपघातात मृत्यू पावलेल्या बहीण भावाची नावे आहेत.
सकाळी हे दोघे बहीण भाऊ शाळेत जाण्यासाठी निमगाव खलू येथून दौंडकडे जात होते. हॉटेल धनश्री समोर जुन्या टोल नाक्याजवळ एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने या दोघा बहीण भावाना समोरून धडक दिली.
यात दोघांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या चालकाविरुध्द कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
एसटीच्या संप सुरु आहे. या संपामुळे शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जात आहे. दोन चिमुरड्यांचा जीव गेला आहे. सरकारने लवकरात लवकर या विषयावर तोडगा काढला पाहिजे.
या संपामुळे अनेक कर्मचारी वर्गाचा ही जीव गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. आजची घटना ही एसटी बंद असल्याने घडली आहे. अतिशय लहान मुलांना या घटनेत जीव गमवावा लागला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
Post a Comment