मी जिल्ह्याची काळजी करतेय....

बीड : माझ्या पाच वर्षाच्या काळात जिल्ह्याला मान खाली घालावी लागेल असं काम केले नाही. चांगले अधिकारी आणले. माझ्यावर ऑपरेशन झाले तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. मी बीड जिल्ह्याची काळजी करते. तुमच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला आहे.


मुंडे म्बणाल्या की, एक स्त्री म्हणून काम करत असताना माझ्या जिल्ह्यातील स्त्रीयांकडे डोळो उघडण्याची हिम्मत कुणाची नव्हती. मी सोलून काढत होते. मी कधी सूडबुद्धीने वागले नाही. विरोधकांचाही द्वेष केला नाही. 

राजकारण करत असताना सरकारमध्ये पाच वर्षे होते. या काळात लोकांचे प्रश्न सोडवले. आज टीव्ही लावल्यानंतर फक्त आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. एक प्रकारची सर्कस सुरु आहे. राजकारण वेगळ्या स्तराला गेले, अशी खंतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

पंकजा पुढे म्हणाल्या की, बाबा घरी असताना डॉक्टर बूट घालून घरी आला. शेतकरीही चिखलाने भरुन आला. साहेब पाठीमागे होते. मी शेतकऱ्याला त्याच चिखलाने माखलेल्या अवस्थेत घरात घेतलं. एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळ्या न्याय असं मी केले नाही. 

माझे कार्यकर्ते दारु पिणारे, तंबाखू खाणारे नाहीत. माझ्या बीड जिल्ह्याचे नाव चांगल्या गोष्टींसाठी घेतलं गेले पाहिजे. माझं नाव कोणत्याही कोनशीलेवर नको, ते तुमच्या हृदयात आहे व तिथेच ठेवा. तुम्ही सांगाल ते मी करेन व करणार. देशातून जास्त खासदार आमचे आहेत, निधी कमी पडू देणार नाही, असा दावाही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post