अमर छत्तीसे
श्रीगोंदा: गेल्या दीड महिन्यांपूर्वी कांद्याने शेतकरी चांगला सुखावला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव कमालीचे गडगडले आहेत. सध्या लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. श्रीगोंद्यातील लिंबाने १००पार केली आहे. किलोला 100चा भाव मिळत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात चालू वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली होती. त्यामुळे डिसेंबर जानेवारी या महिन्यात निघालेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला होता. त्यानंतर बाजरभाव कमी झाले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला.
सध्या लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. श्रीगोंद्यातील लिंबाला १०१ रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे समाधानी झाले आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने लिंबाला परराज्यात मागणी वाढु लागली आहे. त्यामुळे लिंबाला चांगले दिवस आले आहेत. शेतकरी वर्गाने सध्या तरी कच्चे लिंबू काढू नये, अशी प्रतिक्रिया लिंबू उत्पादक संघाचे गोरख आळेकर यांनी दिली.
Post a Comment