नगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती मनसेचे नितीन भुतारे यांनी दिली.
ही वेशभूषा वयोगट १ ते १० वर्षाआतील मुला मुलींसाठी आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावे. असे आवाहन भुतारे यांनी केले आहे.
आपल्या लहान मुला मुलींचे फोटो, व्हिडीओ त्याबरोबर त्यांची पूर्ण नाव, पत्ता खाली दिलेल्या व्हाँट्सअँप नंबर 9850052687 यावर पाठवावे.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मनसेच्या वतीने देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक जिल्हा सचिव नितीन भुतारे , शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, चिञपट सेना सदस्य संकेत होशिंग यांनी केले आहे.
Post a Comment