नगर : जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणामुळे चर्चेत आलेले डॉ. सुनील पोखर्णा यांना पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आलेली आहे.
डॉ. पोखर्णा यांचे निलंबन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. कोणतेही निलंबन तीन महिनेच रहाते. त्यानुसार डॉ. पोखर्णा यांचे निलंबन राज्यपालांकडून रद्द करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोविड आयसीयू सेंटरला सहा नोव्हेंबर २०२१ ला आग लागली होती. या लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोखर्णा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान त्यांना अटकही झाली होती. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच दिवशी सायंकाळी त्यांची सुटकाही करण्यात आली होती. रद्द करण्यात आले आहे.
शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना डॉ. पोखर्णा यांना देण्यात आली आहे.
Post a Comment