पत्रकार चौकात अपघातात दोघांचा मृत्यू...

नगर : नगर-मनमाड महामार्गावर पत्रकार चौकात मंगळवारी (ता. २९) दुपारी ३ च्या सुमारास मालट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने ट्रकखाली चिरडून दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.


या अपघातात बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (वय २२) उद्धव सुभाष तेलोरे (वय २१, दोघे रा. कोल्हार, ता. पाथर्डी) हे दोघे युवक ठार झाल्याचे त्यांच्या खिशातील आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन तसेच महाविद्यालयाचे ओळखपत्र अशा कागदपत्रांच्या आधारावरुन पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मालट्रक (क्र.एम.एच.१६, सी.सी. ५७५९) हा सावेडीकडून डीएसपी चौकाकडे जात असताना पत्रकार चौकात सदर मालट्रकने हिरो होंडा पॅशन मोटारसायकलला (क्र.एम.एच. १६, बी.ई.४९५५) जोराची समोरुन दिली.

यावेळी मोटारसायकलवरील दोघे युवक मालट्रकच्या चाकाखाली अडकून जागेवरच मयत झाले. अपघातानंतर ट्रकचालक वाहन झाला सोडून पसार झावा. तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी आले. 

मयत युवकांच्या खिशामध्ये तसेच आधारकार्ड महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडले असून त्यावरुन त्यांची ओळख पटली असून ते दोघेही पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर पत्रकार चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. दुपारी उशिरापर्यंत ही कोंडी कायम होती. तसेच अपघातातील मयत युवकांच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post